मुरबाड(प्रतिनिधी): मुरबाड तालुक्यात ग्रामीण व शरीर भागात एप्रिल महिना अर्ध्याहून पुढे गेला असून मे आणि जून महिने म्हणजेच अजूनही दोन महिने अद्याप शिल्लक आहेत. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच उन्हाचा तडाका वाढला आहे. त्यामुळे आजचा मुरबाडचा उष्णता पारा ४४ अंशवर गेला आहे. त्यामुळे हा ४४अंश पा-याची मुरबाडच्या इतिहासात पहिल्यांदा नोंद झाली आहे.
नागरिकांनी शक्यतो आपली महत्त्वाची कामे असतील तरच घराबाहेर पडावे, अशा सतत शासन सूचना देत असतात. मात्र, नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि आजाराला कारणीभूत होतात. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे आपण आपल्या कुटुंबाची व स्वतःची काळजी घेऊनच घराबाहेर पडावे तसेच काम असेल तर सकाळीच उरकून घ्यावे तसेच दुपारी १ते ५ वाजेपर्यंत घर सोडू नये अशा प्रकारची सुचना दिल्या जात आहेत. काळजी घेणे गरजेचे आहे. दुपारी एक वाजता ५ वाजेपर्यंत उन्हाचा तडाका प्रचंड असतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना दिल्या जात आहेत.