मुंबई : राज्यांत तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतो आहे. त्यातच पुढील दोन दिवस राज्यातील कमाल तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबईत सुर्य अधिक प्रखर होत आहेच पण कोकणातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
राज्यातील सर्वच भागांत आता उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाल्याचं दिसतंय. अशातच आता कोकण पट्ट्यात आज आणि उद्या पारा चढणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. सध्या राज्यात ३० अंश सेल्सिअस तापमान असून कोकणात मात्र, ५ ते ६ अंश सेल्सिअसने तापमान वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाकडून एकीकडे तापमानात वाढ होणार असल्याचं सांगितलं जातय, तर दुसरीकडे कोकणातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसणार असल्याचीही शक्यता वर्तवण्यात आलीय