Thursday, April 24, 2025
Homeताज्या घडामोडीचिंचवडमध्ये झेंडा भाजपचाच, अश्विनी जगताप यांचा मोठा विजय

चिंचवडमध्ये झेंडा भाजपचाच, अश्विनी जगताप यांचा मोठा विजय

पुणे: चिंचवडमध्ये भाजपने मुसंडी मारत तिरंगी लढतीत भाजपचाच झेंडा फडकवला आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपानं पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळाली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवण्यावर ठाम असल्यामुळे निवडणूक पार पडली. शिवाय, उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्येच बंडखोरी झाल्यामुळे ही तिरंगी लढत झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामध्ये अश्विनी जगताप यांचा ३६, ०९१ मतांनी मोठा विजय झाला.

“मी हा विजय सर्वसामान्य जनतेला आणि लक्ष्मण जगताप यांना समर्पित करते. भाजपाचे नेते, कार्यकर्ते आणि जनतेला माझ्या पाठिशी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद देते. अशा पद्धतीने निवडणूक लढवावी लागेल, असा विचार मी कधीच केला नव्हता. लोकांसाठीची लक्ष्मण जगताप यांची अपुरी राहिलेली कामं आहेत, ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे”, अशी प्रतिक्रिया अश्विनी जगताप यांनी विजयानंतर दिली आहे.

संपूर्ण मतमोजणीत अश्विनी जगताप यांना एकुण १ लाख ३५ हजार ४३४ मतं मिळाली असून, नाना काटे यांना ९९ हजार ३४३ मते मिळाली आहेत. तर राहुल कलाटे यांना ४४ हजार ०८२ मतं मिळाली आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -