न्यूयॉर्क (वृत्तसंस्था): सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने अमेरिकेत विमान सेवा ठप्प झाली आहे. अमेरिकेतील सर्व विमानतळांवरील विमान उभी आहेत. एकही विमान गेल्या काही काळापासून उड्डाण करु शकलेले नाही. केंद्रीय सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने ही विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अमेरिकेतील तब्बल २५ हजार विमान उड्डाण करु शकलेली नाहीत, त्यामुळे विमानतळांवर हजारो लोक अडकले अशी माहिती आहे. जी विमाने अमेरिकेत उतरणार होती त्यांना देखील अजून काही काळ हवेत थांबण्यास सांगण्यात आले आहे.
अमेरिकेत अभूतपूर्व अशी स्थिती निर्माण झाली आहे. एटीएसएससीसी अॅडवायजरी नुसार यूएस नोटम सिस्टीम फेल झाली. त्यानंतर नोटममध्ये कसल्याही प्रकारची दुरुस्ती झालेली नाही. तंत्रज्ञ दुरुस्तीसाठी प्रयत्न करत आहेत. सर्व्हरमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी काम सुरु आहे. मात्र, नेमका किती वेळ लागणार हे अद्याप अस्पष्ट आहे.