इगतपुरी : मुंबई-नाशिक महामार्गाजवळील इगतपुरी शहर बायपासच्या सह्याद्रीनगर समोर मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तालुक्यातील बोरटेंभे येथील तीन युवक जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरील पंढरपुरवाडी भागात रात्री १० वाजेच्या सुमारास घाटनदेवी येथून बोरटेंभेकडे जाण्याऱ्या टांग्याला आणि दुचाकीला भरधाव आयशरने जोरदार धडक दिली. या अपघातात बोरटेंभे येथील प्रभाकर सुधाकर आडोळे (वय, २५), कुशल सुधाकर आडोळे (वय, २२) व रोहीत भगीरथ ओडोळे (वय. १९) हे जागीच ठार झाले.
या अपघातानंतर आयशरचा चालक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.