Friday, March 21, 2025
Homeमहत्वाची बातमीया वर्षी संक्रांत १५ जानेवारीलाच

या वर्षी संक्रांत १५ जानेवारीलाच

मकर संक्रांतीच्या अफवा न पसरवण्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांचे आवाहन

ठाणे : यावर्षी १४ जानेवारी रोजी रात्री ८ वाजून ४४ मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार असल्याने मकर संक्रांती १५ जानेवारी रोजी आल्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. तसेच त्यांनी मकर संक्रांती विषयक वैज्ञानिक माहितीही दिली.

मकर संक्रांती दरवर्षी १४ जानेवारीलाच येते हे खरे नाही. सूर्याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा मकर राशीत प्रवेश करीपर्यंत ३६५ दिवस ६ तास ९ मिनिटे १० सेकंद एवढा कालावधी लागतो. त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस हा पुढे पुढे जात असतो. २००० मध्ये मकर संक्रांती २२ डिसेंबरला आली होती. सन १८९९ मध्ये १३ जानेवारीला आली होती. १९७२ पर्यंत मकर संक्रांती १४ जानेवारीलाच येत होती. २०८५ पर्यंत मकर संक्रांती कधी १४ ला तर कधी १५ जानेवारीला येत राहील. २१०० पासून मकर संक्रांती १६ जानेवारीला येणार आहे. ३२४६ मध्ये मकर संक्रांती चक्क १ फेब्रुवारीला येणार आहे. त्यामुळे मकर संक्रांती नेहमी १४ जानेवारीलाच येते हे खरे नाही. सन २०२४, २०२७ मध्ये मकर संक्रांती १५ जानेवारीला तर सन २०२५, २०२६, २०२९, २०३० मध्ये १४ जानेवारीला येणार आहे.

आपली पंचांगे निरयन पद्धतीची असल्याने सूर्य निरयन राशीत प्रवेश करतो त्यावेळी मकर संक्रांती साजरी करतो. सूर्याने जर रात्री मकर राशीत प्रवेश केला तर दुसऱ्या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाते. दिनमान वाढत जाणे हे वाईट कसे म्हणता येईल? तिळगूळ देऊन गोड बोलायला शिकविणारा हा दिवस वाईट कसा असू शकेल? संक्रांतीदेवीने जर या दिवशी दुष्ट राक्षसाला ठार मारले असेल, तर ते वाईट कसे असू शकेल? मकर संक्रांतीचा सण हा अशुभ नाही. वाईट नाही. मकर संक्रांतीच्या वेळी अनेक खोट्या आणि चुकीच्या अफवा पसरविल्या जातात त्यावरही विश्वास ठेवू नका. अफवा पसरवू नका. मकर संक्रांती कोणालाही वाईट नसते हे सोमण यांनी सांगितले. मकर संक्रांती पुण्यकालात मातीच्या सुगडात ऊस, बोरे, शेंगा, गाजर, ओले हरभरे वगैरे त्यावेळी शेतात पिकणारे पदार्थ आणि तिळगूळ दान देण्याची पद्धत आहे.

तसेच मकर संक्रांतीला काळी वस्त्रे परिधान करण्याची पद्धत आहे. कारण हे दिवस थंडीचे असतात. काळ्या रंगाची वस्त्रे शरीर उबदार ठेवतात. गरोदर महिला, विवाहाच्या प्रथम वर्षी सूना, नूतन वर्षात बालके यांनाही काळी वस्त्रे आणि हलव्याचे दागिने घालून आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. थंडीच्या दिवसात तीळ आरोग्यास चांगले असतात. म्हणून तिळाचे पदार्थ करून खाण्यास सांगितलेले आहेत. ज्यांच्याशी वर्षभरात भांडण झाले असेल, अबोला धरला गेला असेल तर एकमेकांना तिळगूळ देऊन मने एकत्र आणणारा, गोड बोला असा संदेश देणारा हा गोड सण आहे, असे दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -