‘जे जे बाळासाहेबांचे आहे, ते ते एकनाथ शिंदेंचे आहे, वाटीभर पक्षाने आता हट्ट सोडावा’
नागपूर : मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेण्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात काल जोरदार राडा झाला. यानंतर आता भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाला डिवचले आहे. ‘जे जे बाळासाहेबांचे आहे, ते ते एकनाथ शिंदेंचे आहे, वाटीभर पक्षाने आता हट्ट सोडावा’, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
‘ते कार्यालय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहे. त्यांचा अधिकार ते घेणार. जे बाळासाहेबाचे आहे ते सर्व शिंदेंचे आहे. उद्धव ठाकरे यांचा वाटी एवढा ग्रुप राहिला, त्यांनी हट्ट सोडला पाहिजे. जिथे जिथे बाळासाहेब बसायचे तिथे एकनाथ शिंदेंचा अधिकार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत उरलेले जे कार्यालयात गेले त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणीही नितेश राणे यांनी केली आहे.