मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारींसह भाजपा नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर आज महाविकास आघाडीकडून महामोर्चाचे (Morcha) आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या मोर्चावरून भाजपा नेते राम कदम यांनी ट्वीट करत महाविकास आघाडीवर खोचक टीका केली आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही लक्ष केले आहे.
“सोमवारपासून नागपूरमध्ये विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. आजपर्यंतचा इतिहास बघितला, तर विरोधी पक्ष असो किंवा कोणतीही संघटना असो, त्यांनी जिथे अधिवेशन आहे, तिथेच मोर्चा काढला आहे. मात्र, महाविकास आघाडी आता केवळ काही जिल्ह्यांपूरती शिल्लक राहिली आहे. त्यामुळे कदाचित नागपूरमध्ये भाड्याची गर्दी जमणार की नाही, ही शंका असल्यानेच हा मोर्चा नागपूरऐवजी मुंबईत मोर्चा काढण्यात येतोय की काय?” अशी खोचक टीका राम कदम यांनी केली आहे.
सोमवार पासून नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे .. आज पर्यंत कधीही विरोधी पक्ष असो वा अन्य कोणीही संघटना .. जिथे अधिवेशन तिथेच मोर्चा काढतात..
मात्र महा विकास आघाडी जी केवल महाराष्ट्रातल्या केवळ काही जिल्ह्यापूरती किरकोळ शिल्लक असल्यामुळे की काय..
नागपूरला भाड्याची
— Ram Kadam (@ramkadam) December 17, 2022
“बाळासाहेब ठाकरे यांचे संपूर्ण आयुष्य काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात लढण्यात गेले. स्वर्गीय बाळासाहेबांना काय वाटत असेल.. ज्यांनी संपूर्ण हयात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची दुश्मनी केली.. अन आज त्यांचे नातू आणी पुत्र त्याच काँग्रेसच्या पाठीमागे फरफटत चाललेत.. त्यामुळेच हे मात्र निश्चित स्वर्गातूनही बाळासाहेब.. त्यांचे विचार पुढे नेणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन त्यांच्या बहादूर शिलेदारांनाच आशीर्वाद देत आहेत, असेही ते म्हणाले.