मुंबई : मुंबईत महाविकास आघाडीच्या महामोर्चाला (Morcha) सुरुवात झाली आहे. तर भाजपादेखील या मोर्चाला प्रत्यूत्तर म्हणून मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघांत माफी मांगो आंदोलन सुरू आहे. अशातच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मोर्चाला महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसत आहे. परंतू महाआघाडीच्या मोर्चातली वस्तुस्थिती काही वेगळीच आहे.
या महिलांशी लोकमतच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. यावेळी या महिलांनी आपल्याला मोर्चा कसला आहे ते माहिती नाही असे सांगितले. राजूभाई आम्हाला इथे घेऊन आला आहे, असे या महिलांनी सांगितले. या महिलांच्या हाती मोर्चाचे बॅनर होते, त्यावर विचारले असता काहींनी आपण अंगठाछाप असल्याचे सांगितले.
पहा व्हिडीओ…
महाविकास आघाडीचा शिंदे-फडणवीस सरकारला टार्गेट करणारा हल्लाबोल मोर्चा एकीकडे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या मोर्चाला प्रत्त्युत्तर देण्यासाठी भाजपकडून माफी मांगो आंदोलन केले जाणार आहे.
या आंदोलनात जागोजागी ‘उद्धव ठाकरे माफी मागा, नाना पटोले माफी मागा, अजित पवार माफी मागा,’ असे फलक झळकावण्यात येणार आहेत. तसेच काळे झेंडे दाखवत महाविकास आघाडीचा निषेध करण्यात येणार आहे.