मुंबई : अखेर ठाकरे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांचा शिंदे गटातील प्रवेश निश्चित झाला आहे. पुढील ३ दिवसांत आपण अधिकृतरित्या शिंदे गटात प्रवेश करू, अशी घोषणा दीपाली सय्यद यांनी केली आहे.
दीपाली सय्यद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल झाल्या आहेत. त्यापुर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसह रश्मी ठाकरे, संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. संजय राऊत यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळाली, असे दिपाली सय्यद म्हणाल्या.