महाड : आरकेडीएड कॉलेजचे संस्थापक शिक्षणतज्ञ रमेश खानविलकर यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळीचा सण आदिवासी बांधवासोबत साजरा केला.
पाली, माणगाव, महाड या गावातील आदिवासी पाड्यावर हा कार्यक्रम करण्यात आला. आदिवासी पाड्यात माणुसकीची दिवाळी साजरी करण्यात आली.
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर खानविलकर यांच्या माध्यमातून दिवाळीचे किराणा सामान, पणत्या, फटाके, रूमाल, कपडे, मिठाई आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. या पाड्यात वाटप करण्यात आल्यामुळे येथे दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.