Thursday, July 10, 2025

गोरेगाव येथे इमारतीच्या सातव्या मजल्याला आग

गोरेगाव येथे इमारतीच्या सातव्या मजल्याला आग

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील मोहन गोखले मार्गावरील गोकुळधाम जवळील धीरज व्हॅली इमारत क्रमांक दोनच्या सातव्या मजल्याला सोमवारी रात्री आग लागली.


याबाबत महापालिका नियंत्रण कक्षाला विचारले असता, रात्री साडे नऊच्या सुमारास आग लागल्याचे समजले. दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. तसेच, आगीमुळे कोणीही जखमी झाल्याबाबत अद्याप कोणतीही माहिती नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

Comments
Add Comment