Thursday, April 24, 2025
Homeमहत्वाची बातमीदिवाळीच्या मुहूर्तावर सेन्सेक्सने घेतली उसळी

दिवाळीच्या मुहूर्तावर सेन्सेक्सने घेतली उसळी

सेन्सेक्स जवळपास ६५१.१६ अंकांनी वाढला

मुंबई (वार्ताहर) : दिवाळीच्या मुहूर्तावर सोमवारी सेन्सेक्सने चांगलीच उसळी घेतली. सेन्सेक्स जवळपास ६५१.१६ अंकांनी वाढला असून ५९,९५८.३१ अंकांवर स्थिरावला आहे. तर निफ्टी ५० अंकांनी वाढला आहे. ‘मुहूर्त ट्रेडिंग’साठी शेअर बाजारातील व्यवहार एक तासासाठी होतात. ही मुहूर्त ट्रेडिंग त्या दिवशी संध्याकाळी होते.

मुहूर्त ट्रेडिंगची जुनी परंपरा आहे. मुहूर्त ट्रेडिंग करण्याची परंपरा मुंबई शेअर मार्केटमध्ये १९५७ आणि राष्ट्रीय शेअर बाजारात १९९२ पासून सुरू झाली. मुहूर्त ट्रेडिंगच्या दिनी अनेकजण शेअर खरेदी करण्यावर भर देतात. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी होणारी मुहूर्त ट्रेडिंग ही एक जुनी परंपरा आहे. पाच दशकांहून सुरू अधिक काळ सुरू असलेली ही जुनी परंपरा आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी होणाऱ्या १ तासाच्या ट्रेडिंगला ‘मुहूर्त ट्रेडिंग’ म्हणतात. मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान गुंतवणूकदार आपली छोटी गुंतवणूक करतात. ही गुंतवणूक गुंतवणूकदार इक्विटी, इक्विटी फ्यूचर ॲण्ड ऑप्शन, करन्सी ॲण्ड कमोडिटी मार्केटमध्ये करतात.

मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी ट्रे़डिंग करणे हे शुभ असल्याचे समजले जाते. या दिवशी ट्रेडिंग केल्याने समृद्धी येते आणि वर्षभर गुंतवणूकदारांकडे संपत्ती कायम येत राहते असे समजले जाते. मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी खरेदी करण्यात येणार शेअर्स अतिशय खास समजले जातात. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी नवीन काम सुरू करणे हे शुभ असते अशी एक धारणा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -