शिवसागर (वृत्तसंस्था) : भारत-पाक सामना म्हटला तर क्रिकेट चाहतेही टीव्हीसमोरून हलत नाहीत. मात्र या सामन्यातील दबावामुळे काही वाईट घटनाही समोर येतात. आसामच्या शिवसागर जिल्ह्यात रविवारी भारत-पाकिस्तान टी-२० क्रिकेट सामना पाहताना एका ३४ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
कधीही न विसरता येणारा क्रिकेट सामना रविवारी मेलबर्नमध्ये खेळला गेला. भारतीय संघाने ९० हजार प्रेक्षकांसमोर पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने टी-२० विश्वचषकाची धमाकेदार सुरुवात केली. दोन्ही संघांनी जबरदस्त खेळ दाखवला. दरम्यान या सामन्यादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. आसामच्या शिवसागर जिल्ह्यात रविवारी भारत-पाकिस्तान टी-२० क्रिकेट सामना पाहताना एका ३४ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
सामना पाहत असताना तो व्यक्ती अचानक बेशुद्ध झाला आणि खाली पडला. मित्रांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बिटू गोगोई असे मृताचे नाव आहे. दरम्यान, जिल्हा पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला होता.