Saturday, April 26, 2025
Homeताज्या घडामोडीबिल्डर पारस पोरवाल यांनी आत्महत्या का केली?

बिल्डर पारस पोरवाल यांनी आत्महत्या का केली?

२३व्या मजल्यावरून मारली उडी

मुंबई : मुंबईतले प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांनी भायखळा येथे राहत्या घरी २३व्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली. दक्षिण मुंबईतले सर्वात प्रसिद्ध बिल्डर म्हणून त्यांची ओळख होती.

आज सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या कुटुंबालाही यामुळे मोठा मानसिक धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तपासामध्ये पोलिसांना पोरवाल यांनी लिहिलेली एक सुसाईड नोट सापडली आहे. त्या नोटनुसार, पोरवाल यांनी व्यवसायात झालेल्या अर्थिक तोट्यातून जीवन संपविण्याचे हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती मिळते. तसेच या नोटमध्ये आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, कोणाचीही चौकशी करू नये, असे लिहिलेले आहे. नातेवाईकांना त्यांच्या अक्षराची ओळख पटली आहे. त्यांचाही कुणावर संशय नसल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे.

पोलिसांनी पोरवाल यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. पोरवाल कुटुंबातील व्यक्ती, त्यांचे मित्र, काही बिल्डर यांची चौकशी केली जात आहे. ते कुठल्या तणावात होते का, याची चाचपणी केली जात आहे.

याआधीही औरंगाबादचे प्रसिद्ध बिल्डर अनिल अग्रहारकर यांनीही २२ सप्टेंबर रोजी राहत्या घरातील जिममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अग्रहारकर यांना कोट्यवधी रुपयांचे कर्ज आरबीआयकडून मिळवून देतो, असे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी भागवत यशवंत चव्हाण याला बेड्या ठोकल्या. पोलिस त्याच्याकडून तोतया आरबीआय रॅकेटची माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -