नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु झालेल्या टी २० विश्वचषक २०२२ स्पर्धेतील दुसऱ्याच सामन्यात नेदरलँड संघाने युएईवर तीन गडी राखून विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे अत्यंत चुरशीच्या आणि रंगतदार सामन्यात अखेरच्या षटकपर्यंत चुरस दिसून आली, केवळ दोन चेंडू शिल्लक असताना नेदरलँडने विजय मिळवला. ज्यामुळे युएईचे विजयाचे स्वप्न भंगले. पण नेदरलँडने स्पर्धेची विजयी सुरुवात केली आहे. प्रथम फलंदाजी करताना युएईने नेदरलँडला विजयासाठी ११२ धावांचे लक्ष्य दिले. माफक लक्ष्य असतानाही नेदरलँडचा संघ हे पूर्ण करण्यासाठी बरीच धडपड करताना दिसला, पण अखेर दोन चेंडू शिल्लक असताना विजयी धाव घेत ७ विकेट्सने नेदरलँडने विजय मिळवला.
सर्वात आधी नाणेफेक जिंकत युएई संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण नेदरलँड संघाने कसून गोलंदाजी करत जास्त हात खोलण्याची संधी युएईच्या फलंदाजांना दिली नाही. सलामीवीर मुहम्मद वसीमने मात्र ४१ धावांची एकहाती झुंज दिल्यामुळे संघाने १०० धावांचा आकडा ओलांडला. याशिवाय काशिफ आणि अरविंद यांनी अनुक्रमे १५ आणि १८ धावांचे योगदान दिले. इतर खेळाडू दुहेरी संख्याही गाठू शकले नाही. ज्यामुळे अखेर २० षटकांत ८ गडी गमावून युएईचा संघ १११ धावा करु शकला.
ज्यानंतर नेदरलँडचा संघ ११२ धावा करण्यासाठी मैदानात उतरला. विशेष म्हणजे नेदरलँडच्या एकाही फलंदाजांने लक्षणीय कामगिरी केली नाही. पण सांघिक कामगिरीच्या जोरावर त्यांनी कसेबसे ११२ धावांचे लक्ष्य गाठले आणि ३ गडी १ चेंडू राखून विजय मिळवला. युएईच्या संघाकडून मॅक्स ओडेवडने सर्वाधिक २३ धावा केल्या. अगदी अखेरच्या षटकापर्यंत सामना रोमहर्षक झाला. शेवटच्या षटकामध्ये ६ चेंडूमध्ये ६ धावा करण्यासाठी नेदरलँडला ५ चेंडू खेळावे लागले. ज्यानंतर अखेर पाच चेंडू खेळून ३ गडी १ चेंडू राखून नेदरलँडचा संघ सामना जिंकला. नेदरलँडच्या बॅस डी लीडने गोलंदाजीत ३ बळी घेतले आणि १४ धावाही केल्या, ज्यामुळे त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.