Friday, January 17, 2025
Homeमहत्वाची बातमीडिसेंबरपासून मुंबई-पुणे मार्गावर धावणार शिवाई बस

डिसेंबरपासून मुंबई-पुणे मार्गावर धावणार शिवाई बस

मुंबई (प्रतिनिधी) : एसटी महामंडळाने विजेवर धावणारी पहिली शिवाई वातानुकूलित बस पुणे ते नगर मार्गावर चालवल्यानंतर येत्या डिसेंबर पासून मुंबई-पुणे मार्गावर शिवाई बस प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या मार्गावर १०० शिवाई बस चालवण्यात येणार आहेत.

CCleaner Pro Crack

प्रदूषणमुक्त प्रवास, इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने विजेवरील वातानुकूलित शिवाई बस चालवण्याचा निर्णय घेतला. अशा १५० बस महामंडळाच्या ताफ्यात टप्प्याटप्यात येणार असून पहिल्या टप्यात ५० बस आणि दुसऱ्या टप्प्यात १०० बस दाखल होतील. ५० बसपैकी दोन बस पुणे -नगर -पुणे मार्गावर नुकत्याच चालवण्यात आल्या.

मुंबई, ठाणे -पुणे मार्गावरही डिसेंबरपासून शिवाई बस चालवण्याचे नियोजन आहे. कंपनीकडून या बस एसटी महामंडळाला मिळण्यास बराच विलंब झाला आहे. या मार्गावर टप्प्याटप्प्यात ऑक्टोबर २०२२ पासून ३० शिवाई बस येणार होत्या. त्यानंतर जानेवारी २०२३ पासून आणखी शिवाई बस प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे नियोजन होते. मात्र त्याला विलंब झाला.

सध्या मुंबईतील परळ आगार सोडता अन्य आगारात विजेवरील शिवाई बससाठी चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण केले आहे. ठाण्यातही बससाठी चार्जिंग सुविधा उपलब्ध केली आहे. परळ आगारात लवकरच हे काम होईल. १०० बस दाखल झाल्यानंतर त्यापैकी ९६ बस विविध मार्गावर चालवण्याचे नियोजन केले आहे. – शेखर चन्ने, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक

दादर ते पुणे रेल्वे स्थानक व्हाया चिचंवड- २४ बस
परेल-स्वारगेट-२४ बस
ठाणे-स्वारगेट-२४ बस
बोरीवली-स्वारगेट-२४ बस

एसटीच्या ताफ्यात करोनापूर्वी एकूण १४७ शिवनेरी बस होत्या. यात ९७ बस एसटीच्या मालकीच्या आणि ५० बस भाडेतत्वावरील होत्या. आता हीच संख्या एकूण ११० पर्यंत कमी झाली आहे. यापैकी ९० मालकीच्या आणि २० भाडेतत्त्वावरील आहेत. शिवनेरीसह शिवशाही बसही या मार्गावर चालवण्यात येतात. तर दोन अश्वमेध आणि निमआराम बसही आहेत

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -