Friday, April 25, 2025
Homeमहत्वाची बातमीमनमाडमध्ये सिलेंडरच्या ट्रकला आग; स्फोटांनी परिसर हादरला

मनमाडमध्ये सिलेंडरच्या ट्रकला आग; स्फोटांनी परिसर हादरला

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून दुर्घटनांचे सत्र सुरू आहे. शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला आग लागून झालेल्या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक अपघात झाला आहे. गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक पलटी होऊन त्याला आग लागल्याची घटना मनमाडपासून जवळच पुणे-इंदौर महामार्गावर घडली आहे.

ट्रकला आग लागल्यानंतर सिलेंडरचे एका मागोमाग एक स्फोट होत असल्याने या मार्गावरील वाहतूक २ किलोमीटर अंतरावरच रोखून धरण्यात आली आहे. ट्रकमध्ये गॅसने भरलेले सुमारे २०० सिलेंडर असल्याचे सांगण्यात येत आहे.

अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र सिलेंडरचे स्फोट होत असल्यामुळे तेथे जाण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -