Thursday, April 24, 2025
Homeक्रीडाराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत डायव्हिंगमध्ये मेधालीचे "स्वप्नवत सुवर्णपदक"

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत डायव्हिंगमध्ये मेधालीचे “स्वप्नवत सुवर्णपदक”

राजकोट (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मेधाली रेडकर हिने डायव्हिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न साकार केले. तिची सहकारी ऋतिका श्रीराम हिने कांस्यपदक पटकावित येथे तिसऱ्या पदकाची नोंद केली.

एक मीटर स्प्रिंग बोर्ड प्रकारात मेधाली हिने लवचिकता व आकर्षक रचना याचा सुरेख समन्वय दाखवत सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेप्रमाणेच राष्ट्रीय स्तरावरील तिचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे. ती मुंबई येथे तुषार गीते यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. व्यवसायाने फिजिओ असलेल्या या खेळाडूने आजपर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावर भरपूर पदके जिंकली आहेत.

सुवर्णपदक मिळवल्यानंतर मेधाली रेडकरने सांगितले की,” आजपर्यंत राष्ट्रीय स्तरावर मला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे येथे सर्वोत्तम कामगिरी करण्याचे ध्येय होते आणि मी सर्वोच्च कौशल्य दाखविले. राष्ट्रीय स्तरावर पहिले सुवर्णपदक मिळविल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. हे सुवर्णपदक माझ्या भावी करिअरसाठी प्रेरणादायकच आहे.”

ऋतिकाची पदकांची हॅटट्रिक

ऋतिका श्रीराम हिने येथे पदकांची हॅटट्रिक पूर्ण केली. तिने याआधी या स्पर्धेत तीन मीटर्स स्प्रिंग बोर्ड व हाय बोर्ड प्रकारात सोनेरी कामगिरी केली होती. तिचे पती आणि आंतरराष्ट्रीय डायव्हिंगपटू हरी प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करीत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -