Thursday, April 24, 2025
Homeमहत्वाची बातमीनिर्देशांकांत बाऊन्स... तर सोनेही तेजीत!

निर्देशांकांत बाऊन्स… तर सोनेही तेजीत!

डॉ. सर्वेश सुहास सोमण

आपण आपल्या मागील महिन्याच्या लेखात ‘शेअर बाजाराने केला मंदीचा आलेख’ हा लेख लिहिला होता. त्यानुसार आपण निर्देशांकामध्ये मोठी घसरण होईल, असे सांगितलेले होते. आपण निर्देशांक निफ्टी १७७०० असतानाच जोखीम घेण्याची क्षमता असणाऱ्या गुंतवणूकदारांनी पूट ऑप्शन प्रकारात व्यवहार केल्यास चांगला फायदा मिळू शकेल, हे सांगितलेले होते. आपण सांगितल्यानंतर केवळ ३ आठवड्यांत निफ्टीमध्ये जवळपास १००० अंकांची घसरण झालेली आहे. अनेक दिवसांच्या घसरणीनंतर या आठवड्यात घसरणीला तात्पुरता विराम मिळाला. पुढील आठवड्याचा विचार करता निफ्टीची १६८०० ही अत्यंत महत्त्वाची पातळी असून जोपर्यंत निफ्टी या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत निर्देशांकांतील तेजी कायम राहील. ज्यामध्ये निफ्टी १७२०० पर्यंत मजल मारणे अपेक्षित आहे. टेक्निकल अॅनालिसिसनुसार मध्यम मुदतीच्या चार्टनुसार “सिप्ला” या शेअरने १०८३ ही अत्यंत महत्त्वाची पातळी तोडत तेजी सांगणारी रचना तयार केलेली आहे. त्यामुळे या शेअरमध्ये पुढील काळात अल्पमुदतीत चांगली वाढ होणे अपेक्षित आहे. त्यामुळे आज १११४ रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये योग्य पद्धतीने स्टॉपलॉस ठेवून तेजीचा व्यवहार केल्यास चांगला फायदा होऊ शकेल. शेअर बाजारात घसरण होत असताना त्याप्रमाणे “टाटा इन्व्हेस्ट” या शेअरने देखील करेक्शन दाखविले आहे. टक्केवारीत पाहावयाचे झाल्यास आपण सांगितल्यानंतर केवळ एका आठवड्यात या शेअरने ५८ टक्क्यांची घसघशीत वाढ दिलेली आहे. पण आज २३०२ रुपये किमतीला असणारा हा शेअर परत एकदा मोठी तेजी दाखवू शकतो. अल्प तसेच मध्यम मुदतीचा विचार करता निर्देशांकांनी तेजीचे संकेत दिलेले असल्यामुळे टेक्निकल बाबतीत तेजीची दिशा असणाऱ्या शेअर्समध्ये स्टॉपलॉसचा वापर करूनच गुंतवणूक करावी.

पुढील आठवड्याचा विचार करता शेवटच्या सत्रात झालेल्या तेजीनंतर निर्देशांक निफ्टी काही आठवडे रेंज बाऊंड राहू शकते. चार्टचा विचार करता निफ्टी पुढील काळात १६८०० ही अत्यंत महत्त्वाची खरेदीची पातळी आहे, जोपर्यंत ही पातळी तुटत नाही, तोपर्यंत निर्देशांकांत बाऊन्स होऊ शकतो. मात्र जर ही पातळी तुटली तर मात्र निर्देशांक निफ्टीमध्ये आणखी २०० ते २५० अंकांची घसरण होऊ शकते. पुढील आठवड्याचा विचार करता १७३०० ही विक्रीची पातळी असून जोपर्यंत निफ्टी ही पातळी ओलांडत नाही, तोपर्यंत नवीन मोठी तेजी येणार नाही. मध्यम मुदतीच्या चार्टनुसार ट्रील, सोम डिस्टीलरी, लिबर्टी शूज यांसह अनेक शेअर्सची दिशा तेजीची आहे. कमोडीटी मार्केटचा विचार करता टेक्निकल अॅनालिसिसनुसार या सोन्याची दिशा आणि गती ही अल्पमुदतीसाठी मंदीची आहे. आता सोन्याची ४८८०० ही अत्यंत महत्त्वाची खरेदीची पातळी आहे. जोपर्यंत सोने या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत सोने बाऊन्स करू शकते. आपण मागील लेखात सांगितल्याप्रमाणे अल्पमुदतीचा विचार करता ५०७०० ही सोन्याची विक्रीची पातळी असून जोपर्यंत सोने ही पातळी तोडून स्थिरावत नाही, तोपर्यंत सोन्यात मोठी तेजी येणार नाही. त्यानुसार सोन्याने ५०६८९ हा उच्चांक या आठवड्यात नोंदविला. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा मोठी घसरण सोन्यात पाहावयास मिळाली. आपण सांगितलेल्या विक्रीच्या पातळीपासून सोने ६०० रुपयांनी घसरले. टेक्निकल चार्टनुसार कच्च्या तेलाची दिशा आणि गती ही मंदीची असून कच्च्या तेलाची ६३०० ही अत्यंत महत्त्वाची खरेदीची पातळी असून जोपर्यंत या पातळीच्या वर कच्चे तेल आहे, तोपर्यंत कच्च्या तेलात बाऊन्स होऊ शकतो. ज्यामध्ये कच्चे तेल ६८०० पर्यंत वाढ दाखवू शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -