मुंबई : मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून, पुढील तीन दिवस राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दरम्यान, सध्या राज्यात परतीच्या पावसासाठीचे पोषक वातावरण तयार झाले असून हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आजही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज कोकणातील तिन्ही जिल्ह्यात पावासाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर वगळता इतर जिल्ह्यातही पावासाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातही आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आज देखील राज्यात हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या सरी बसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच पुढचे तीन दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.