Friday, April 25, 2025
Homeक्रीडाभारताकडून श्रीलंकेचा धुव्वा; महिला आशिया चषक स्पर्धेची विजयी सुरुवात

भारताकडून श्रीलंकेचा धुव्वा; महिला आशिया चषक स्पर्धेची विजयी सुरुवात

ज्योत्स्ना कोट- बाबडे

सिल्हेट (वृत्तसंस्था) : जेमीमाह रॉड्रिग्सचे धडाकेबाज अर्धशतक आणि त्याला मिळालेली गोलंदाजांची जोड या जोरावर भारतीय महिला संघाने श्रीलंकेला पराभूत करत महिला आशिया चषक स्पर्धेची सुरुवात अपेक्षित अशा दमदार विजयाने केली.

महिला आशिया चषक २०२२ स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सिल्हेटमध्ये चमारी अटापट्टूच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. एकदिवसीय मालिकेत इंग्लंडविरुद्ध ३-० असा ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर संघाने तीच विजयी लय आशिया चषक २०२२ मध्येही पुढे नेण्याचा धडाका सुरू ठेवला आहे. त्यामुळे भारतीय महिला संघाकडून असलेल्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.

प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संपूर्ण संघ १८.२ षटकांत १०९ धावा करत सर्वबाद झाला. फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या महिला संघाने परंपरेप्रमाणे भारतासमोर शरणागती पत्कारली. दीप्ती शर्माने तिसऱ्या षटकात भारताला पहिला बळी मिळवून दिला. भारतीय संघ तीन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरला होता. सामन्यात भारताने क्षेत्ररक्षण कमालीचे करत दोन धावबाद केले. शेवटच्या चार विकेट्स खूप झटपट पडल्या आणि भारताने १० चेंडू शिल्लक असतानाच खेळ आटोपला. १७व्या षटकात दयालन हेमलताने उशिरा एंट्री करून लंकन खेळाडूंना धक्का दिला आणि तिने पहिल्या ४ चेंडूंत ओशाडी रणसिंघे आणि सुगंधिका कुमारीला बाद केले. टीम इंडियाकडून हेमलताने २.२ षटकांत १५ धावा देत ३ बळी मिळवले. शेवटच्या षटकात अचीनी कुलसूर्याला रिचा घोषने यष्टीचीत केले.

तत्पूर्वी, दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्राकरने प्रत्येकी २ बळी घेतले. तत्पूर्वी, सिलहेट येथे श्रीलंकेच्या महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता; परंतु शफाली वर्मा (१०) आणि स्मृती मन्धाना (६) लवकर बाद झाल्यानंतर, जेमिमाह रॉड्रिग्सने दुखापतीनंतर शानदार पुनरागमन करत ७६ धावा करून अर्धशतक ठोकले. तिला कर्णधार हरमनप्रीतने साथ दिली. जेमिमाने कर्णधार हरमनप्रीतच्या सोबतीने तिसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी केली. हाच सामन्याचा टर्निंग पॉइंट म्हणता येईल. जेमिमाहने ५३ चेंडूंत ७६ धावा केल्या, तर हरमनप्रीतने ३० चेंडूंत ३३ धावा केल्या. त्यामुळे सुरुवातीला अडखळलेल्या भारताने श्रीलंकेला सन्मानजनक १५१ धावांचे लक्ष्य दिले. श्रीलंकेसाठी ओशादी रणसिंघे हिने ३२ धावा देत सर्वाधिक ३ विकेट घेतल्या.

जेमिमाहचे विक्रमी अर्धशतक

जेमिमाह रॉड्रिग्सने ७६ धावा करत तिच्या कारकिर्दीतील सर्वोच्च तसेच भारतातर्फे आशिया चषकातील दुसरी सर्वोच्च टी-२० धावसंख्या गाठली. तिच्याआधी माजी कर्णधार मिताली राज पहिल्या स्थानी आहे. मितालीची खेळी भारतातर्फे आशिया चषकातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. आघाडीच्या नामवंत बॅटर्स लवकर बाद झाल्यानंतर तिने जबाबदारीने खेळणे कसे असते याचा जणू क्लासच घेतला. महिला आशिया चषकात अजून एकाही बॅटरने शतक झळकावलेले नाही. भारतीय बॅटर्सकडूनच हाही विक्रम व्हावा, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -