नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट संघाची नवी जर्सी नुकतीच लाँच करण्यात आली आहे. लाईट ब्ल्यू रंगात ही जर्सी आहे. उद्या मंगळवारपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपासून भारतीय संघ ही जर्सी परीधान करणार आहे. आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ याच जर्सीत दिसणार आहे.
यावेळी जर्सीचा रंग म्हणून थोडा लाईट ब्लू कलरचा वापरण्यात आला आहे. यापूर्वी भारतीय संघ गडद निळ्या रंगाची जर्सी परिधान करत होता. २००७ मध्ये झालेल्या पहिल्या टी-२० वर्ल्ड कपच्या भारतीय जर्सीतही फिकट निळा रंग वापरण्यात आला होता. त्यानंतर टीम इंडिया चॅम्पियन झाली.
बीसीसीआयने तीन दिवसांपूर्वी नवीन जर्सी लवकरच लॉन्च करण्याची माहिती दिली होती. संघाच्या किट प्रायोजकानेही या वृत्ताला दुजोरा दिला होता. भारतीय पुरुष संघासह महिला संघही ही नवी जर्सी परिधान करेल. मागच्या वेळी लाँच केलेली जर्सीही दोन्ही संघांनी वापरली होती.