नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील जायकवाडी धरणातून १ लाख १३ हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे ६२० कुटुंबांना स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जायकवाडी धरणाचे एकूण २७ दरवाजे उघडण्यात आले आहे. ज्यात ९ आपत्कालीन दरवाजांचासुद्धा समावेश आहे. तर दीड लाख क्युसेकने पाणी सोडल्यास पुराचे पाणी पैठण शहरात घुसण्याची शक्यता असते. त्यामुळे पैठण नगर परिषदेने आशा भागातील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना दिल्या आहे. तर काही नागरिकांचे स्थलांतर सुद्धा करण्यात आले आहे.
येथील धरणे जवळपास पूर्णपणे भरली असून, पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत करण्यात येत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात सद्या ९० हजार क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणातून १ लाख १३ हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर गरज पडल्यास पाण्याचा विसर्ग वाढवून दीड लाख करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. त्यामुळे पैठण शहरातील ६२० कुटुंबांना स्थलांतराच्या सूचना स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आले आहे.