Thursday, April 24, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेकोळसेवाडीत बॉम्बची अफवा पसरविणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात

कोळसेवाडीत बॉम्बची अफवा पसरविणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात

कल्याण (वार्ताहर) : कोळसेवाडी बाजारपेठेत कचरा कुंडीमध्ये बॉम्ब आहे. आजूबाजूला लहान मुले, माणसे आहेत लवकर या, असा फोन करत पोलीस यंत्रणेस वेठीस धरणाऱ्या एका माथेफिरू तरुणाला कोळशेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान कोळशेवाडी बाजारपेठेत कचराकुंडीमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळताच पोलिसांची एकच तारांबळ उडाली. हा कॉल आल्यानंतर कोळशेवाडी पोलिसांच्या पथकाने तत्काळ कोळशेवाडी बाजारपेठ परिसरात धाव घेत कचराकुंडी जवळ शोध घेतला.

अवघ्या काही मिनिटातच ही अफवा असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी देखील सुटकेचा श्वास सोडला. सदर कॉल ट्रेस करत पोलिसांनी अफवा पसरवल्याप्रकरणी नीलेश फड या १९ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -