नाशिक (प्रतिनिधी) :- सोशल मीडियाचे अकाउंट हॅक करून नागरिकांकडून पैसे उकळण्याचे प्रकार अनेकवेळा घडत असतात. अशाच एका प्रकारातून आता नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांचे इंस्टाग्रामचे अकाउंट हॅक झाले आहे.
हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने हे अकाउंट डिलीट केले. यापूर्वी महापालिका आयुक्तांच्या नावाने अशाचप्रकारे एक खाते तयार करण्यात आले होते. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या खात्यावर अनेकांची नजर असल्याचे दिसून येत आहे.
या अकाउंटच्या माध्यमातून काही पैशाची मागणी सुद्धा करण्यात आली असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे नागरगोजे यांनी अकाउंट तातडीने बंद केले आहे. लवकरच याबाबत ते तक्रार दाखल करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
“माझे इंस्टाग्रामचे अकाउंट हॅक होऊन त्यातून काही रकमेची मागणी होत असल्याचे लक्षात आले. परंतु तातडीने हे खाते बंद करून टाकण्यात आले आहे. आता याबाबत पुढील कारवाईसाठी लवकरच निर्णय घेणार आहे. – डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिकारी महापालिका