मुंबई : केंद्रीय मंत्री, भाजप नेते नारायण राणे यांच्या जुहूमधल्या निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले आहे. कोकणात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरे करत असताना नातवाच्या हट्टापायी मागिल चार वर्षापासून आपण मुंबईतल्या निवासस्थानीही बाप्पांची मनोभावे पुजाअर्चा करण्यात येते.

नारायण राणेंनी कुटुंबीयांसह गणपतीची पूजा केली. महाराष्ट्राच्या अपेक्षा पूर्ण करण्याची बुद्धी देवो, असे सूचक विधान करत यावेळी राणेंनी गणरायाला साकडे घातले. तसेच राज्याला दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तीपासून दूर ठेवण्याची प्रार्थनाही राणेंनी गणरायाला केली आहे.
गणरायाकडे काही मागत नाही, कारण गणरायाने आपल्याला खूपकाही दिल्याचे समाधानही त्यांनी यावेळी व्यक्त केले.