Friday, April 25, 2025
Homeताज्या घडामोडीटिकटॉक स्टार भाजप नेत्या सोनाली फोगट यांचे निधन

टिकटॉक स्टार भाजप नेत्या सोनाली फोगट यांचे निधन

नवी दिल्ली : भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांचे सोमवारी गोव्यात हृदय विकाराने निधन झाले. त्या टिकटॉक स्टार म्हणूनदेखील प्रसिद्ध होत्या.

सोनाली फोगट यांचा जन्म २१ सप्टेंबर १९७९ रोजी हरियाणातील फतेहाबाद येथे झाला. त्या ४३ वर्षांच्या होत्या. सोनाली फोगट या भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या उपाध्यक्षा होत्या.

भाजपने त्यांना हिसार जिल्ह्यातील आदमपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती, मात्र त्या निवडणुकीत पराभूत झाल्या. सोनाली फोगट यांच्यासमोर २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते कुलदीप बिश्नोई हे उमेदवार होते. भाजपच्या हरियाणा युनिटनेही त्यांची महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती.

सोनाली फोगट एक अभिनेत्री होत्या त्यांनी. दूरदर्शनवर शो अँकर केले होते. सोनाली यांनी छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. विशेष म्हणजे टिकटॉक स्टार म्हणूनही त्यांची ओळख आहे. सोनाली फोगट यांनी सोमवारी रात्रीच इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. टिकटॉकसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध असलेल्या सोनालीने बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या १४ व्या सीझनमध्ये त्या सहभागी होत्या.

२००६ मध्ये सोनाली फोगट यांनी हिसार दूरदर्शनमध्ये अँकरिंग करून करिअरची सुरुवात केली. दोन वर्षांनंतर २००८ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून त्या पक्षाच्या सक्रिय सदस्य होत्या. मात्र २०१६ मध्ये अचानक त्यांचे पती संजय यांचा फार्म हाऊसमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला तेव्हा त्या प्रसिद्धीझोतात आल्या होत्या. मात्र त्यावेळी त्या मुंबईत होत्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -