बर्मिंगहम : भारतीय महिला हॉकी संघाने न्यूझीलंडचा पराभव करत कांस्यपदक जिंकले. नियमित वेळेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक गोल केला. यानंतर भारताने पेनल्टी शूटआऊटमध्ये न्यूझीलंडचा पराभव करत कांस्यपदक जिंकले.
भारतीय महिला हॉकी संघाने राष्ट्रकुल क्रीड स्पर्धेत न्यूझीलंडवर पेनल्टी शूट आऊटमध्ये विजय मिळवून कांस्यपदक जिंकले. निर्धारीत वेळेत शेवटच्या १८ सेकंदात भारताने न्यूझीलंडला पेनल्टी स्ट्रोक दिल्याने १-१ अशी बरोबरी झाली. पण, पेनल्टी शूटआऊटमध्ये सविताने अप्रतिम बचाव केला.