Tuesday, July 23, 2024
Homeक्रीडाभारताच्या अमित पंघलने पटकावले सुवर्णपदक

भारताच्या अमित पंघलने पटकावले सुवर्णपदक

बर्मिंगहम : बॉक्सिंगमध्ये भारताचा बॉक्सर अमित पंघालने पुरुषांच्या ४८-५१किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने अंतिम सामन्यात इंग्लंडच्या किरन मॅकडोनाल्डचा ५-० असा पराभव केला. आज भारताच्या खात्यात दोन सुवर्णपदक जमा झालेत. भारताने आतापर्यंत १५ सुवर्णपदकासह एकूण ४२ पदक जिंकली आहेत.

२०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने रौप्यपदक जिंकले, त्यापाठोपाठ आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून त्याने इतिहास घडविला. २०१९ च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेचे सुवर्ण, २०१७ मध्ये कांस्य व २०२१मध्ये रौप्यपदक त्याने जिंकले. २०१९च्या जागतिक स्पर्धेत त्याने रौप्यपदक जिंकले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -