मुंबई : ज्यावेळी तुम्ही सत्तेत असता त्यावेळी तुम्ही मराठवाडा, कोकण, विदर्भासाठी काय केले याच्या आधारवर जनता मूल्यमापन करत असते. केवळ भावनिक भाषण देऊन जनता सोबत येत नसते असा टोलाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. त्यांनी त्यांच्या पक्षाचे काम करावे आम्ही आमच्या पक्षाचे काम करत असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत आमच्या युतीला राज्यातील जनतेने कौल दिला असल्याचे फडणवीस म्हणाले.
मंत्रालयाचे सचिवालय झाले असल्याची टीका होत आहे. याबाबत फडणवीस यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला. यावेळी ते म्हणाले की, माहिती असतानाही राजकाराणासाठी अशी डायलॉगबाजी केली जाते. गेल्या सरकारमध्येही देखील सचिवांना काही अधिकार दिले होते. तसेच आमच्या सरकारमध्येही अनेक मंत्र्यांनी सचिवांना काही अधिकार दिले होते असे फडणवीस म्हणाले. ही महाराष्ट्रात नाही तर देशात परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळं त्यांना आता बोलावेच लागेल. त्यांना हे विसरावे लागेल की त्यांचा काळातही ३० ते ३२ दिवस पाचच मंत्री होते असा टोला पडणवीसांनी अजित पवारांना लगावला.