Thursday, April 24, 2025
Homeमहत्वाची बातमीदिनेश गुणवर्धने श्रीलंकेचे नवे पंतप्रधान

दिनेश गुणवर्धने श्रीलंकेचे नवे पंतप्रधान

कोलंबो : दिनेश गुणवर्धने श्रीलंकेचे नवे पंतप्रधान बनले आहेत. राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी त्यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. गुणवर्धने हे शिक्षणमंत्री राहिलेले आहेत. २०२०च्या संसदीय निवडणुकीनंतर त्यांची परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते रानिल विक्रमसिंघे यांचे वर्गमित्र आहेत.

श्रीलंकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा भार आता विक्रमसिंघे आणि गुणवर्धने या जोडीवर आहे.

दरम्यान, रानिल विक्रमसिंघे राष्ट्रपती झाल्यानंतरही श्रीलंकेत शांतता प्रस्थापित झालेली नाही. त्यांना गोटाबायांचे प्यादे असे सांगून आंदोलकांनी आंदोलन अधिक तीव्र केले आहे. गुरुवारी उशिरा कोलंबोमधील श्रीलंकेच्या राष्ट्रपती सचिवालयाच्या बाहेर गाले फेसमध्ये सुरक्षा दले आणि शेकडो निदर्शकांमध्ये संघर्ष उडाला.

आर्थिक आणि राजकीय संकटादरम्यान श्रीलंकेच्या संसदेने २० जुलै रोजी माजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांची नवीन राष्ट्रपती म्हणून निवड केली. असे असतानाही रस्त्यावर उतरून लोकांचे आंदोलन सुरूच आहे. आंदोलकांचा आरोप आहे की राजपक्षे कुटुंबाने विक्रमसिंघे यांना त्यांचे प्यादे म्हणून सिंहासनावर बसवले आहे. यामुळे परिस्थिती बदलणार नाही. ते म्हणाले की राजपक्षे घराण्याने विक्रमसिंघे यांच्याशी आपले सिंहासन वाचवण्यासाठी करार केला आहे. ही लोकांची फसवणूक आहे.

गाले फेस कोलंबोचे प्रोफेसर एमजी थरका म्हणाले की, गेल्या तीन महिन्यांत सरकारमध्ये सहभागी असलेल्या नेत्यांनी परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक गोष्टींचे दावे केले आहेत, परंतु प्रत्यक्षात स्थिती सुधारलेली नाही. आता लोकांचा राजपक्षे कुटुंबावर आणि त्यांनी बसवलेल्या कोणत्याही नेत्यावर विश्वास राहिलेला नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -