मुंबई : ठाण्याजवळ लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची उपनगरीय वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे रेल्वे स्थानकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे.
मुंबईसह राज्यात आजही मुसळधार!
ठाणे स्थानकात लोकल बंद पडल्यामुळे मध्य रेल्वेचा खोळंबा झाला आहे. लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल बंद पडली आहे. सध्या प्रशासनाकडून लोकल बाजूला काढण्याचे काम सुरु आहे. त्यानंतर स्लो ट्रॅक सुरू होईल, याला अजून काही वेळ लागू शकतो. दरम्यान, ठाणे स्थानकात लोकलमध्ये झालेल्या बिघाडामुळे कळवा, मुंब्रा अशा स्थानकात देखील मध्य रेल्वेच्या धीम्या ट्रॅकवरील लोकल खोळंबल्या आहेत.