नवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ११ हजार ७९३ नवीन रुग्ण आढळले असून, कोविडमुळे २७ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ९६,७०० आहे.
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, दैनंदिन सकारात्मकता दर 2.49 टक्के आहे. तर, साप्ताहिक सकारात्मकता दर 3.36 टक्के होता. गेल्या 24 तासांत 4,73,717 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 197.31 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. सध्या देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 96,700 आहे. सध्या सक्रिय प्रकरणं 0.22% आहेत. तर, बरं होण्याचं प्रमाण 98.57 टक्के आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 9,486 रुग्ण बरे झाल्यानं एकूण बरं होण्याचा आकडा 4,27,97,092 वर पोहोचलाय. आतापर्यंत देशात एकूण 86.14 कोटी कोरोना चाचण्या झाल्या आहेत.