मुंबई : मुंबईतल्या कुर्ला भागात आज पहाटे एक इमारत कोसळली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, राज्याचे नगरविकास मंत्री आणि बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी या दुर्घटनाग्रस्तांना मदत जाहीर केल्याचे बंडखोर आमदार मंगेश कुडाळकर यांनी ही मदत जाहीर केली आहे.
कुर्ला इमारत दुर्घटना प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून मंगेश कुडाळकर यांनी मृतकांच्या परिवाराला ५ लाख रुपयांची मदत तर जखमींना १ लाख रुपयांची मदत जाहीर केली. मंगेश कुडाळकर हे सध्या बंडखोरांच्या गटात गुवाहाटीला आहे.
मुंबईतल्या कुर्ला येथे नाईक नगर परिसरात चार मजली इमारत कोसळली. यामध्ये सध्या ८ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून एकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. जखमींमध्ये सर्व पुरुषांचा समावेश आहे. जखमी झालेल्यांमध्ये साधारणतः २५ ते ४० वयोगटातले आहेत. या इमारतीला महापालिकेकडून नोटीस देण्यात आली होती. तरीही काही लोक तिथे राहत होते.