मुंबई (प्रतिनिधी) : गेमिंग ‘स्टार्ट-अप’ मध्ये ‘विन्झोला’ आपल्या इकोसिस्टीममध्ये एक लाखांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण करण्याची शक्यता असल्याची माहिती, कंपनीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली आहे. खेळांच्या संख्येत वाढ झाल्याने कंपनी गृहिणी, शिक्षक आणि इच्छुकांना कामाच्या आधारावर देय असलेल्या विविध असाइनमेंटसाठी नियुक्त करत असून येत्या काही वर्षांमध्ये ही संख्या वाढणार असल्याचा कंपनीचा दावा आहे.
दोन वर्षांपूर्वी, ‘विन्झो’ २५,००० ‘मायक्रो इन्फ्लुएन्सर्स’सोबत काम करत होते. ते दरमहा सुमारे ३० ते ४० हजार रुपये कमावत होते. आजपर्यंत ही संख्या एक लाखपर्यंत वाढली आहे. ते दरमहा सरासरी ७५ हजार ते एक लाख रुपये कमावत आहेत. पुढील एका वर्षात ही संख्या दुप्पट म्हणजेच दोन लाख होईल आणि त्यांचे पेआउट देखील दोन ते अडीच पट वाढेल. ‘विन्झो’सोबत वाढलेले आणि पाच ते दहा लाख रुपये दरमहा कमावणारे काही इन्फ्लुएन्सर्स आहेत. ‘विन्झो’ने इंग्रजी, हिंदी, गुजराती, मराठी, बंगाली आणि भोजपुरीसह १२ हून अधिक भाषांमध्ये गेम सुरू केले आहेत.
यासाठी अनेक अनुवादक कंपनीशी जोडले गेले असून विविध भाषांमध्ये काम करत आहेत. विविध भाषांमध्ये गेमची मागणी वाढल्याने, अनुवादकांचीही संख्या वाढली आहे. दोन वर्षांपूर्वी विन्झोबरोबर तीनशे ते चारशे अनुवादक होते. ‘विन्झो’ने आणखी पाच भाषा जोडून आणि भाषांची संख्या १२ वर नेल्याने आता देशभरात ही संख्या सात हजार अनुवादक झाली आहे. पुढील वर्षभरात अनुवादकांच्या संख्येत किमान दीड ते दोन पट वाढ होईल. अनुवादक दर महिन्याला सरासरी ३५ ते ५० हजार रुपये कमावतात.
यात कंपनीचा एकही कर्मचारी नसून इंटरनेटची सुविधा असणार्या गृहिणी, शिक्षक अथवा सुशिक्षीत युवकांना अनुवादकाची कामं मानधन तत्त्वावर दिली आहेत. सरकारने अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंगला मान्यता दिली आहे. कॉमिक्स क्षेत्र हे रोजगार निर्मितीसाठी संभाव्य विभागांपैकी एक आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या विभागाची क्षमता ओळखण्यासाठी ‘एव्हीजीडी प्रमोशन टास्क फोर्स’ची स्थापना केली आहे.
ती तीन महिन्यांमध्ये पहिली कृती योजना सादर करेल. विन्झो, कंपनीची क्षमता दुप्पट करून पुढील दीड वर्षांत ३०० पर्यंत नेण्याची योजना आखत आहे. कारण प्लॅटफॉर्म वेब ३.० मध्ये प्रवेश करत आहे, जे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असेल. कंपनी लोकांना थेट कामावर ठेवण्याऐवजी वेगळे काही तरी करू इच्छिते. खेळांवर खर्च होत असलेल्या वेळेमुळे भारत जागतिक ग्रिडवर गेमिंगचा केंद्रबिंदू बनला आहे.