पालघर (प्रतिनिधी) : मुलांच्या गुणवत्तावाढीसाठी तसेच मुलांना कृतीतून आनंददायी शिक्षण मिळत आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षक मेहनत घेत आहेत. याच जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व करत आहेत, असे उद्गार जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण यांनी कासा येथे ‘मुले काय शिकली?’ या प्रदर्शनी कार्यक्रमात काढले. जिल्हा पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळामध्ये ‘सिखे’ या संस्थेच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू असून आज कासा, कोल्हान, चारोटी, निकणे या केंद्रांतील शाळा व शिक्षकांनी या संस्थेमार्फत तीन महिन्यांमध्ये ‘मुले काय शिकली?’ व कसे शिक्षण घेतात, याचे प्रदर्शन कासा जिल्हा परिषद शाळांमध्ये आयोजित केले होते.
पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण यांनी या प्रशिक्षणाला भेट देऊन संस्थेला आणि शिक्षकांना प्रोत्साहन दिले. यावेळी डहाणू तालुक्यातील सभापती स्नेहलता सातवी, पंचायत समिती सदस्य स्वाती राऊत, अरुण कदम ‘सिखे’ संस्थेचे पदाधिकारी वैशाली, केंद्रप्रमुख आदी उपस्थित होते. या उपक्रमात २० शाळा सहभागी झाल्या होत्या. वेगवेगळ्या साहित्याचा वापर करून गणित, भूगोल, विज्ञानसारखे विषय सहज सुलभतेने कसे शिकवता येतील, असे उपक्रम यावेळी सादर करण्यात आले.
या उपक्रमात अनेक शाळा सहभागी झाल्या होत्या. केंद्र-कोल्हाणमधील जि. प. शाळा पिंपळशेत जि. प. शाळा वांगर्जे चरीपाडा, जि.प.शाळा तवा जि.प.शाळा धामटणे, केंद्र- चारोटीमधील जि.प.शाळा चारोटी, जि.प.शाळा, चारोटी-बसवतपाडा, जि.प.शाळा गोरखानपाडा, जि.प. शाळा विव्हळवेढे, जि. प.शाळा, ओसरवीरा जि. प.शाळा धानीवरी सहभागी शाळा,केंद्र-कासामधील जि. प. शाळा कासा, जि. प. शाळा वेती, जि. प. शाळा वरोती, जि.प.शाळा दह्याळे, जि. प. शाळा. खानीव जि. प. शाळा पावन केंद्र – निकणेमधील जि. प. शाळा सारणी, जि.प.शाळा निकणे, जि.प.शाळा निकणे घाटाळपाडा, जि.प. शाळा उर्से या शाळांचा प्रदर्शनामध्ये सहभाग होता.