मुंबई : विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षाने लावून धरली आहे. यासाठी भाजपच्या वतीने आज विधीमंडळ परिसरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. यावेळी भाजपने विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनाही स्वाक्षरी करायला लावली.
झिरवळ विधीमंडळाच्या इमारतीत प्रवेश करत असताना त्या ठिकाणी भाजपचे नेते पायऱ्यांवर घोषणाबाजी करत होते. नरहरी झिरवळ येताच गोंधळादरम्यान झिरवळ यांच्याकडून भाजपच्या नेत्यांनी स्वाक्षरी करून घेतली. सध्या या स्वाक्षरीची राजकारणात चर्चा रंगली आहे.
पायऱ्यांवर माणूस गोंधळून जातो – जितेंद्र आव्हाड
झिरवळ यांच्या मदतीला मंत्री जितेंद्र आव्हाड सरसावले आहेत. पायऱ्यांवर इतका गोंधळ असतो की माणूस गोंधुळन जातो. नरहरी झिरवळ ही साधी व्यक्ती आहे. आदिवासी समाजातून आलेला आहे. कारण नसताना त्यांना घेरण्याचे काम करू नये, असे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.