मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या अनेक कलाकार हे विवाह बंधनात अडकत असल्याचे दिसत आहे. बॉलिवूडमधील अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफचा (Katrina Kaif) शाही विवाह सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. आता लवकरच बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर आणि मॉडेल शिबानी दांडेकर विवाहबंधनात अडकणार आहेत. 21 फेब्रुवारी रोजी फरहान आणि शिबानी कोर्ट मॅरेज करणार आहेत. कोर्ट मॅरेज झाल्यानंतर रिसेप्शनचा कार्यक्रम पार पडेल असं म्हटलं जात आहे.
फरहान-शिबानीची लगीनघाई
