मुंबई : अभिनेता सलमान खान यानं त्याच्या शेजाऱ्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केलाय. मुंबईतल्या शहर दिवाणी न्यायालयात सलमाननं दावा दाखल केलाय. पनवेलमधल्या सलमानच्या फार्म हाऊसजवळच्या भूखंडाचे मालक असलेल्या केतन कक्कर यांनी यूट्यूब चॅनेलवरून सलमानबाबत अपमानास्पद शब्दांचा वापर केला. हा दावा दाखल झाल्यानंतर न्यायालयानं कक्कर यांना उत्तर देण्यास सांगितलं आहे. या प्रकरणात पुढची सुनावणी 21 जानेवारीला होणार आहे.
सलमान खानने केला शेजाऱ्याविरोधात मानहानीचा दावा
