Tuesday, April 22, 2025
Homeमहत्वाची बातमीसिद्धिविनायक मंदिर प्रवेश : क्यूआर कोडमधील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई कधी?

सिद्धिविनायक मंदिर प्रवेश : क्यूआर कोडमधील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई कधी?

हिंदु जनजागृती समितीचा सवाल

मुंबई: श्री सिद्धिविनायक मंदिरात प्रवेश मिळण्यासाठी भाविकांना देण्यात येणाऱ्या क्यू.आर. कोडमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात उघड झाले; मात्र अद्याप या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. पोलीस आणि प्रशासन या प्रकरणातील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई कधी करणार? असा प्रश्न हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी उपस्थित केला आहे.

कोरोनाचे संकट पूर्णत: दूर झाले नसल्याने मंदिरात दर्शनासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाने ‘अॅप’ची निर्मिती केली आहे. त्याद्वारे नोंदणी केल्यावर भाविकांना ‘क्यू.आर.कोड’ सह दर्शनाची वेळ दिली जाते. ‘कोड’ दाखवूनच दर्शनासाठी प्रवेश मिळतो. अनेक भाविकांना हे ठाऊक नसल्याने ते नोंदणी न करताच मंदिरात येतात; परंतु येथे आल्यावर ‘क्यू.आर.कोड’ च्या अभावी मंदिरात प्रवेश मिळत नाही. याचा गैरफायदा घेऊन काही लोकांनी मंदिरात प्रवेश मिळवून देणारा ‘क्यू.आर.कोड’ स्वत: तयार करून विकायला प्रारंभ केला आहे. अशा प्रकारे १ हजार रुपयांपर्यंत अवैधपणे ‘क्यू.आर.कोड’ कोड विक्री केली गेली. याविषयी भाविकांनी मंदिर प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत; मात्र अद्याप त्यावर ठोस कारवाई झालेली नाही.

‘क्यू.आर्.कोड’ प्रकरणी पुन्हा असा गैरप्रकार होऊ नये; म्हणून श्री सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी ‘ॲप’मध्ये बुकींग करताना आधार कार्ड क्रमांक आणि दर्शनार्थीचे नाव घालण्याची सुविधा निर्माण करावी. मंदिरात दर्शन घेताना भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये किंवा आर्थिक भुर्दंड बसू नये, अशी भाविकांची अपेक्षा आहे.

या प्रकरणात सहभागी सर्व दोषी आणि त्या मागील मुख्य सूत्रधार यांना त्वरित अटक करून कठोर कारवाई व्हावी यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने याविषयी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे निवेदन दिले आहे. या प्रकरणात लक्ष घालून भाविकांना आश्वस्त करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने डॉ. उदय धुरी यांनी केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -