मुंबई : बहुविशेष आरोग्य सुविधा देणाऱ्या नावाज़लेले सैफी हॉस्पिटलने रोटरी क्लब ऑफ़ बॉम्बे (आरसीबी) च्या वतीने मुंबईत मोफत मोतीबिंदू शिबिराचे आयोजन केले आहे. या मोहिमेत पुढील ६ महिन्यात वंचित रुग्णांकरिता १०० मोफत शस्त्रक्रिया करुन दिल्या जातील.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर मोफत शस्त्रक्रियांसाठी लोकांची निवड केली जाईल. नेत्र आणि कागदपत्रांच्या तपासणीनंतर रुग्णांची योग्यता मोफत शस्त्रक्रियेसाठी ठरवली जाईल.
यावेळी बोलताना सौ. तस्नीम फिदवी, सहाय्यक संचालक, प्रशासन, सैफी हॉस्पिटल म्हणाल्या, “आम्ही सैफीत या दृढ़ आत्मविश्वासावर काम करतो की मानवतेची निस्वार्थ सेवा आमच्या रुग्णांपासूनच सुरू होते. कितीही आव्हानात्मक परिस्थिती का असु दे आम्ही दर्जेदार रुग्ण सेवा प्रदान करण्याचा पुढाकार घेतो. या मोहिमेद्वारे आम्ही जे रुग्ण आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत त्यांना वैद्यकीय सेवेची निवड करण्याकरिता आरोग्य जनजागृती समुदायात सामील करण्याचे आमचे ध्येय आहे.”
सर्व तपासण्या पूर्ण झाल्यावर शस्त्रक्रिया केल्या जातील. साप्ताहिक शस्त्रक्रिया निर्धारित केल्या गेल्या आहेत जेणे करुन वेळेत निर्धारित संख्येत शस्त्रक्रिया केल्या जावू शकतील.
शिबिराचे उद्दिष्ट दृष्टी समस्या असलेल्या लोकांना ओळखणे आणि त्यांची दृष्टी जाण्याच्या आत त्यांना त्वरित उपचार देणे आहे. “आमचे लक्ष सर्वात गरजूंपर्यंत पोहोचण्याचे आहे जेणेकरून आमच्या सेवांचा लाभ त्यांना लवकरात लवकर मिळू शकतो. या लोकांपर्यंत त्वरित पोहोचून त्यांची शस्त्रक्रिया त्यांच्या जीवनाची गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारू शकते. याने त्यांच्या उपजीविकाही सुधारु शकते,” असे स्वयंसेवी अबुजार एन झाकीर, अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे मिड टाऊन म्हणाले.
रोटरी क्लब ऑफ बॉम्बेसह सैफी रुग्णालयात सर्व अनिवार्य तपासांचा समावेश केला जाईल. यामध्ये सीबीसी, मूत्र दिनचर्या, प्री-ऑप प्रोफाइल, एफएचएस, पीपीबीएस, ईसीजी, ए-स्कॅन, स्टे-इन डेकेअर वॉर्ड, ऑपरेशन थिएटर, उपकरणांचे शुल्क, शस्त्रक्रिया साहित्य, लेन्स आणि आहारतज्ञांनी सांगितलेल्या आहाराचा समावेश असेल. कोणत्याही मदतीची गरज असलेल्या रुग्णांना सैफी रुग्णालय आणि आरसीबी चे प्रतिनिधी मार्गदर्शन करतील.
सैफी हॉस्पिटल ट्रस्टचे सैफी हॉस्पिटल २५७ बेडचे अत्याधुनिक हॉस्पिटल आहे. इथे मोठ्या प्रमाणात लोकांना आंतरराष्ट्रीय जागतिक दर्जाची सेवा देण्याचा प्रयत्न करण्याचा उद्दिष्ट असतो. एका दशकाच्या अल्पावधीत, हे औषध आणि आरोग्य सेवेच्या अनेक क्षेत्रात उत्कृष्टतेचे केंद्र बनले आहे आणि देशभरातील तसेच जगभरातील ५० हून जास्त देशांतील लोक सैफी हॉस्पिटलला भेट देतात. रोबोटिक सहाय्याने केलेल्या जटिल शस्त्रक्रियांचे प्रमाण आणि विविधता पाहता; सैफी हॉस्पिटल दक्षिण मुंबईतील प्रगत रोबोटिक सर्जरीचे केंद्र बनत आहे.