महाड: राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे येत्या ७ डिसेंबरला रायगडला भेट देणार आहेत. हवाई मार्गे ते रायगडावर येणार आहेत. मात्र चक्क राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं विमान रायगडावर उतरवण्यास शिवप्रेमींनी विरोध केला आहे. शिवप्रेमींचा विरोध पाहता आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रायगडावर जाण्याचा मार्ग बदलला आहे. शिवप्रेमींचा विरोध पाहून आता राष्ट्रपतींनी रोपवेने रायगडावर जाण्याचं ठरवलं आहे.
याबाबत राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी ट्विट केलं आहे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत दुर्गराज रायगडावर येण्याची इच्छा राष्ट्रपची महोदयांनी व्यक्त केली आहे. यासाठी शिवभक्तांच्या भावनेचा आदर राखत ते गडावर रोपवेने येणार आहेत. राष्ट्रपती महोदयांच्या या शिवभक्तीस मी सल्यूट करतो.
छत्रपति शिवाजी महाराज को अपने श्रद्धा सुमन अर्पित करने हेतु माननीय राष्ट्रपति ने सभी प्रकार की कठिनाइयों को सहर्ष सहने की सहमति दी ।उन्होंने शिवभक्तों की भावनाओं का संज्ञान लेते हुए रायगढ़ दुर्ग पर रज्जुमार्ग से पहुँचना स्वीकार किया है। माननीय राष्ट्रपति की शिवभक्ति को मेरा सलाम।
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) December 4, 2021
Opposition to President’s helicopter at Raigad
दरम्यान ३ डिसेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीमध्ये आता पर्यटकांना रायगड किल्ला पाहता येणार नाही. सुरक्षेच्या कारणास्तव रायगड किल्ला आणि रोपवे या कालावधीत पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.