मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे मंत्री नवाब मलिक आणि वानखेडे कुटुंबीयांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिकांच्या विरोधात केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने वानखेडेंना कोणताही दिलासा देण्यास नकार देत नवाब मलिकांना वक्तव्य करण्यापासून रोखण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
आपल्या कुटुंबीयांची विनाकारण बदनामी केली जात असल्याचे सांगत वानखडे यांनी मलिक यांच्याविरोधात अब्रुनुकसानीची याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले. मलिकांनी केलेली वक्तव्ये योग्य पद्धतीने तपासून केलेली नाहीत, असे निरीक्षण नोंदवत या प्रकरणाची पुढील सुनावणी २० डिसेंबरला होणार आहे.