Friday, January 17, 2025
Homeक्रीडापाकिस्तानचा बांगलादेशवर निसटता विजय

पाकिस्तानचा बांगलादेशवर निसटता विजय

ढाका (वृत्तसंस्था) : पाकिस्तानने बांगलादेशला अटीतटीच्या सामन्यात पराभूत करत मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले. पण सोमवारच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी पाकिस्तानच्या तोंडाला फेस आला. अखेरच्या षटकात विजयासाठी ८ धावांची गरज असताना बांगलादेशचा कर्णधार महमुदुल्लाह याने तीन विकेट्स घेत पाकिस्तानच्या तोंडाला फेस आणला होता.

पाकिस्तान संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसारखी कामगिरी करता आली नाही. बांगलादेशविरुद्ध त्यांनी ट्वेंटी-२० मालिकेत ३-० असा निर्भेळ यश मिळवले असले तरी यजमानांनी पाकिस्तानला विजयासाठी संघर्ष करायला लावला. तिसऱ्या सामन्यात, तर बांगलादेशनं विजय मिळवलाच होता, पण थरारक लढतीत पाकिस्तानने बाजी मारली. १२५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला अखेरच्या चेंडूपर्यंत संघर्ष करावा लागला. अखेरच्या षटकात विजयासाठी ८ धावांची गरज असताना बांगलादेशचा कर्णधार महमुदुल्लाह याने तीन विकेट्स घेत पाकिस्तानच्या तोंडाला फेस आणला होता.

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशला ७ बाद १२४ धावा करता आल्या. मोहम्मद नईमने ४७ धावांची खेळी केली. त्याला शमिम होसैन (२२) व आफिफ होसैन (२०) यांनी चांगली साथ दिली. पाकिस्तानकडून मोहम्मद वासिम व उस्मान कादीर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. बाबर आजमचा अपयशाचा पाढा याही सामन्यात कायम राहिला. १९ धावांवर तो माघारी परतला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -