अहमदाबाद (वृत्तसंस्था) : पाकिस्तानमधून चीनला जाणाऱ्या मालवाहू जहाजात कोणतेही धोकादायक किरणोत्सारी पदार्थ आढळले आहेत. सीमा शुल्क आणि महसूल गुप्तचर संचालनालयाने गुजरातमधील अदानी बंदरावर ही संयुक्त कारवाई केली.
पाकिस्तानमधून चीनला जाणाऱ्या या जहाजात कोणतेही धोकादायक किरणोत्सारी पदार्थ नसल्याचे सांगण्यात आलं होते. मात्र, १८ नोव्हेंबरला सीमा शुल्क आणि डीआरआयने तपासणी केली असता या मालवाहू जहाजावरील कंटेनरमध्ये वर्गवारी ७ मधील घातक किरणोत्सारी पदार्थ असल्याचे उघड झालं. यानंतर या जहाजावरील हे कंटेनर उतरवून तपासणी करण्यात येत आहे. हे जहाज अदानी बंदरावर उतरणार नव्हते.
आम्ही सीमाशुल्क विभाग आणि डीआरआयच्या या कारवाईत पूर्ण सहकार्य केले. अदानी समुह राष्ट्रीय सुरक्षेशी कोणतीही तडजोड होणार नाही, असे अदानी बंदर प्रशासनाने म्हटले आहे.