मुंबई : एसटीच्या खासगीकरणाचा विचार नसल्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे.
तोटय़ात गेलेली एसटी नफ्यात आणण्यासाठी एसटीच्या खासगीकरणाचा पर्याय पुढे आला असून, याबाबत अभ्यास करण्यासाठी ‘केपीएमजी’ या खासगी संस्थेची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे. वेगवेगळे पर्याय तपासण्याची सूचना सल्लागार कंपनीला दिले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांना जे काही द्यायचे आहे ते एसटीचे उत्पन्न वाढवून द्यायचे आहे. त्यामध्ये एका बाजूला उत्पन्न वाढवून खर्च कसा कमी करता येईल याबाबत चर्चा झाली आहे. काही मुद्यांवर चर्चा सुरू आहे, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे.