Monday, May 20, 2024
Homeमहत्वाची बातमीCoastal Road : कोस्टल रोडचं ८३% काम पूर्ण; याच महिन्यात होणार खुला

Coastal Road : कोस्टल रोडचं ८३% काम पूर्ण; याच महिन्यात होणार खुला

मुंबई ते रायगड अंतर बारा मिनिटांत कापता येणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती

मुंबई : मुंबईच्या लोकसंख्येत (Mumbai Population) आणि पर्यायाने वाहतूक कोंडीत (Traffic Jam) दिवसेंदिवस वाढ होत आहे. नेहमीच्या ट्रॅफिक जामला मुंबईकर वैतागले असतानाच एक दिलासादायक बाब समोर आली आहे. मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचं (Coastal Road) ८३% काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होणार आहे. जानेवारी अखेरपर्यंत मुंबईकरांकरता कोस्टल रोडच्या पहिला टप्प्याचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. मुंबई आयुक्त इक्बाल चहल हे देखील यावेळी उपस्थित होते.

कोस्टल रोडची पाहणी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोस्टल रोडच्या एका टनलचं (Tunnel) काम मरीन ड्राईव्ह ते वरळी सी-फेस ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण होणार असून लवकरच त्याचे उद्घाटन होणार आहे. तर दुसऱ्या टनलचं काम मे २०२४ पर्यंत पूर्ण होईल. दोन्ही बोगद्यांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. दुर्घटना घडल्यास किंवा आग लागल्यास धूर बाहेर फेकला जाईल अशी प्रणाली करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मविआ सरकारवर साधला निशाणा

मुख्यमंत्री म्हणाले, कोस्टल रोड ३१ जानेवारीला सुरु होईल. एमटीएचएल १२ जानेवारीला खुला होईल. यामुळे १२ मिनिटांत रायगड जिल्ह्यात जाता येणार आहे. हे सर्व विकासाचे प्रकल्प आहे. कोस्टल रोड वरळीपर्यंत न थांबता वांद्रे – वर्सोवा आणि वर्सोवा ते विरार जाता येणार आहे. ही सर्व रखडलेली काम होती, आधीच्या लोकांनी ही कामं बंद पाडली होती, गतीमान पद्धतीनं आपण काम करतोय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मविआ सरकारवर निशाणा साधला.

मुंबईला होणारा धोका टाळण्यासाठी दर सहा महिन्यांनी दिला जातो अहवाल

राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था या समुद्राच्या अभ्यास करणार्‍या यंत्रणेने कोस्टल रोडच्या कामामुळे समुद्रावर होणारा परिणाम, समुद्राचे तापमान, लाटांचा पॅटर्न, गढूळपणा यांचा अभ्यास केला. दर सहा महिन्यांनी सरकारकडे या यंत्रणेकडून अहवाल दिला जातो. त्यामुळे समुद्रातील आगामी धोक्यांची सूचना यंत्रणेला मिळू शकते .

तसेच कोस्टल रोड आणि पर्यायाने मुंबईचं संरक्षण करणारी समुद्र भिंत श्रीलंका आणि फ्रान्स या देशांतील कामांचा अभ्यास करुन बनवली गेली आहे. समुद्र भिंत बांधतांना नैसर्गिक खडक समुद्रातील जैवविवीधतेला पुरक असे निवडले गेले आहेत. समुद्र लाटांचा प्रभाव कमी करणारे तंत्र समुद्र भिंत बांधतांना वापरले गेले आहेत, ज्यामुळे मुंबईला संभाव्य धोक्यांपासून वाचवता येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -