देशातील ८९ मतदारसंघात ६४.७० टक्के मतदान; महाराष्ट्रात ५३.७१ टक्के मतदान

Share

मुंबई : देशभरातील ८९ मतदारसंघात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. या सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची वेळ संपेपर्यंत अर्थात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी ६४.७० इतके टक्के मतदान झाले. तर यांपैकी महाराष्ट्रात आठ मतदारसंघात ५३.७१ इतके टक्के मतदान झालं. यामध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक ५६.६६ टक्के मतदानाची नोंद झाली. निवडणूक आयागानं ही आकडेवारी जाहीर केली आहे.

देशातील १३ राज्यांमध्ये एकूण ८९ मतदारसंघांत दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी २६ एप्रिल रोजी पार पडले. यासाठी १६ कोटी मतदार पात्र होते, पण त्यांपैकी सुमारे ९ कोटी मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ९ मतदारसंघ हे अनुसुचित जातीसाठी तर ७ मतदारसंघ अनुसुचित जमातीसाठी राखीव होते.

यामध्ये केरळमधील सर्व २० मतदारसंघातील मतदान पूर्ण झालं आहे. तर महाराष्ट्रातील १३ मतदारसंघातील मतदान संपलं. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात आसाममधील ५, बिहारमधील ५, छत्तीसगडमधील ३, कर्नाटकातील १४, मध्यप्रदेशातील ७, महाराष्ट्रात ८, मणिपूरमध्ये १, राजस्थानात १३, त्रिपुरात १, उत्तर प्रदेशात ८, पश्चिम बंगालमध्ये ३ आणि जम्मू व काश्मीर या राज्यात १ मतदारसंघात शुक्रवारी मतदान पार पडले.

दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी झालेल्या मतदानामुळं प्रकाश आंबेडकर (अकोला), नवनीत राणा (अमरावती), रविकांत तुपकर (बुलडाणा), रामदास तडस (वर्धा) यांच्यासह देशभरात ओम बिर्ला, राहुल गांधी, हेमा मालिनी, अरुण गोविल, एच. डी. कुमारस्वामी, शशी थरूर, भूपेश बघेल, के. सी. वेणुगोपाल, दानिश अली या महत्वाच्या उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झाले आहे.

महाराष्ट्रातील आठ मतदारसंघातील मतदान

वर्धा – ५६.६६ टक्के
वाशिम-यवतमाळ – ५४.०४ टक्के
अमरावती – ५४.५० टक्के
अकोला – ५२.४९ टक्के
बुलडाणा – ५२.८८ टक्के
हिंगोली – ५२.०२ टक्के
परभणी – ५३.७९ टक्के
नांदेड – ५३.५३ टक्के

Recent Posts

Shrimant Dagadusheth Ganpati : दगडूशेठ हलवाई गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य!

आकर्षक फुल आणि आंब्यांनी केली मंदिराची सजावट पुणे : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी…

2 mins ago

Axis Bank : ॲक्सिस बँकेची तब्बल २२.२९ कोटी रुपयांची फसवणूक!

काय आहे प्रकरण? मुंबई : ॲक्सिस बँकेच्या (Axis Bank) संदर्भात एक मोठी बातमी समोर आली…

10 mins ago

Sanjay Raut : संजय राऊत यांनी पंतप्रधानांबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपकडून तक्रार दाखल!

ऐन निवडणुकीच्या वेळी राऊतांच्या अडचणी वाढणार नाशिक : ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत…

56 mins ago

SSC HSC Exam fee hike : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय! दहावी, बारावीच्या परीक्षा शुल्कात ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ

जाणून घ्या नेमकं कारण काय? मुंबई : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या माध्यमिक…

1 hour ago

Savings: बचत खात्यावर कसे मिळणार FDचे रिटर्न?

मुंबई: प्रत्येकजण आपल्या कमावलेल्या पैशातून काही ना काही रक्कम वाचवत असतो. थोड्या थोड्या पैशातूनच बचतीची…

3 hours ago

IPL 2024: कोहलीच्या जोरावर RCB प्लेऑफसच्या शर्यतीत, जाणून घ्या संपूर्ण गणित

मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ एका वेळेसाठी पॉईंट्स टेबलमध्ये सर्वात खालच्या १०व्या स्थानावर होते. त्यावेळी…

4 hours ago