Saturday, May 4, 2024
Homeदेशsolar energy : सौरऊर्जेच्या वापराने ३२० अब्ज रुपयांची बचत

solar energy : सौरऊर्जेच्या वापराने ३२० अब्ज रुपयांची बचत

भारताची कामगिरी

मुंबई (वृत्तसंस्था) : भारताने सौरऊर्जेचा (solar energy) वापर करून कोळसा, वायूच्या खर्चामध्ये सुमारे ३२० अब्ज रुपयांची बचत केली आहे. ही बचत या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये करण्यात आली आहे. याशिवाय १९० लाख टन कोळशापोटी होणारा खर्च कमी झाला आहे. चीनने सौरऊर्जेच्या माध्यमातून सर्वाधिक खर्च वाचवला असल्याचे अहवालात म्हटले आहे.

सौरऊर्जेच्या क्षेत्रात भारत वेगाने प्रगती करत आहे. परिणामी, पारंपरिक इंधनाच्या स्रोतांपासून सुटका होत आहे. गॅस आणि कोळशाचा वापर टाळून कोट्यवधी रुपयांची बचत होत आहे. एका अहवालानुसार, भारताने सौरऊर्जेचा वापर करून सुमारे १९० लाख टन कोळशाची बचत केली आहे. कोळशाच्या बचतीमुळे देशांतर्गत पुरवठ्याला मोठी मदत झाली आहे. कारण पुरवठ्यावरील दबाव थोडा कमी झाला आहे. ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या ‘एम्बर’ या संस्थेने हा अहवाल जारी केला आहे. याशिवाय ‘सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर’ आणि ‘इन्स्टिट्यूट फॉर एनर्जी इकॉनॉमिक्स अ फायनान्शिअल ऍनालिसिस’ यांनीही सौरऊर्जा वाढीची माहिती दिली आहे. या अहवालात गेल्या दशकाचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे आणि सौरऊर्जेच्या क्षेत्रात कोणत्या देशात काय प्रगती झाली आहे? हे सांगितले आहे. या अहवालात म्हटले आहे की, सौरऊर्जेच्या क्षेत्रात जगातल्या पहिल्या दहा अर्थव्यवस्थांमध्ये पाच देश आशियातले आहेत. यामध्ये चीन, जपान, भारत, दक्षिण कोरिया आणि व्हिएतनामचा समावेश आहे.

सौर ऊर्जेतून होणारी बचत मोजली तर एका दशकात जीवाश्म इंधनावरील खर्चात नऊ टक्के बचत झाली आहे. भारताने सौरऊर्जेचा वापर करून कोळसा तसेच वायूच्या खर्चावर सुमारे ३२० अब्ज रुपयांची बचत केली आहे. ही बचत या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये करण्यात आली आहे. याशिवाय १९० लाख टन कोळशापोटी खर्च कमी झाला आहे. चीनने सौरऊर्जेच्या माध्यमातून सर्वाधिक खर्च वाचवला असल्याचे अहवालात म्हटले आहे. चीनमध्ये ३४ अब्ज डॉलरपर्यंतची बचत झाली आहे. चीनमध्ये एकूण विजेपैकी पाच टक्के वीज सौरऊर्जेतून येते. चीनने २१ अब्ज डॉलर्सच्या कोळसा आणि वायूची बचत केली आहे. दुसऱ्या क्रमांकावर जपान आहे, या देशाने सौरऊर्जेचा वापर करून तेल, कोळसा आणि वायूची बचत केली.

जपानने सौर ऊर्जेतून १.७ अब्ज डॉलर वाचवले. सर्वात जलद सौरऊर्जेचे काम जपानमध्ये करण्यात आले आहे. २०१८ मध्ये तिथे कमी सौरऊर्जा निर्माण झाली होती; परंतु २०२२ मध्ये, सौरऊर्जेने जपानच्या एकूण वीज खर्चात ११ टक्के घट नोंदवली. या वर्षी जानेवारी ते जून या कालावधीत जपानमधली सौरऊर्जेची मागणी १४ टेरावॅट तासांनी वाढली. थायलंड आणि फिलीपिन्समध्ये सौरऊर्जेचा वेग खूपच मंद होता; तरी तेल आणि कोळशाच्या खर्चात मोठी बचत झाली आहे. सौरऊर्जेच्या स्त्रोतांवर लक्ष केंद्रित करून या देशांनी विजेचे नवीन स्रोत स्वीकारल्यामुळे हे घडले. थायलंडमधल्या एकूण विजेमध्ये दोन टक्के वाटा सौरऊर्जेचा आहे आणि सौर ऊर्जेतून या देशाने सुमारे दोन हजार डॉलर वाचवले आहेत. त्याचप्रमाणे, फिलीपिन्सनेदेखील सौर उर्जेचा वापर करून ७८ दशलक्ष डॉलरची बचत केली आहे. इथे एकूण विजेपैकी फक्त एक टक्का वीजनिर्मिती सौरऊर्जेतून होते.

महत्वाची बातमी…

stock market : भारतीय शेअर बाजार बनणार जगातला तिसरा मोठा भांडवली बाजार

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -